वाहतूक व संदेशवहन

काय करावे बरे

views

2:33
काय करावे बरे : मुलांनो, मीनाला अतिशय महत्त्वाचा संदेश लगेचच परगावी पाठवायचा आहे. त्यासाठी तिने कोणत्या साधनाचा वापर करावा असे तुम्हांला वाटते? वि.१. सर मीनाने मोबाइलचा वापर करावा. वि. 2 – सर मीनाने टेलिफोनचा वापर करावा किंवा इ-मेल पाठवावा. बरोबर आहे मुलांनो, मीनाने या साधनांचा वापर केल्यास तिचा संदेश लगेच परगावी पोहचेल. माहीत आहे का तुम्हांला : मुलांनो अलिकडील काळात मोबाइल फोनचा प्रचंड प्रमाणात वापर वाढला आहे. मोबाइल फोन हे बिनतारी संदेशवहनाचे साधन आहे. हवेतील ध्वनि लहरींमार्फत मोबाईल फोन एकमेकांशी जोडले जातात. परंतु, मुलांनो या लहरींचा त्रास आपल्या आवडत्या चिमणीला होतो. त्यामुळे आपल्या परिसरातून चिमण्या नाहीशा होत आहेत.