राज्यकारभाराची घडी बसवली

शिवरायांची संरक्षण – व्यवस्था

views

2:55
शिवरायांचे सैन्य: शिवरायांच्या सैन्याचे घोडदळ व पायदळ हे मुख्य विभाग होते. शिवाजी महाराजांच्या सैन्यात घाटमाथ्यावरील मावळे व कोकणातील हेटकरी लोक असत. पायदळात दहा सैनिकांचा मिळून दाहिजा असे. त्यावर हवालदार, जुमलेदार, एक हजारी, पंच हजारी, सरनोबत असे अधिकारी असत. सैन्यातील दुसरे दल म्हणजे घोडदळ होय. घोडदळाचेही दोन विभाग होते. एक विभाग बारगिरांचा होता. बारगिरांना सरकारकडून हत्यारे व घोडे मिळत असत. सरकारी घोड्यांवर खुणेकरिता शिक्के मारीत. बारगिरांना महिन्याला पगार दिला जाई. घोडदळातील दुसरा विभाग होता शिलेदारांचा. शिलेदारांकडे स्वत:चा घोडा व स्वत:ची हत्यारे असत. शिलेदार आपला घोडा व हत्यारे घेऊन लढाईत भाग घेत असत. शिवरायांचा सैन्यावर धाक होता. त्यामुळे त्यांचे सैन्य शिस्तबद्ध होते. सैन्याची शिस्त कडक असे. आणलेली सर्वच्या सर्व लूट, पैसे, दाग-दागिने सरकारात भरावे लागत. तसेच स्वारीवर किंवा लढाईला जाताना स्त्रियांना बरोबर नेण्यास मनाई असे. त्यामुळे सैनिक पूर्णपणे लढाईवर लक्ष केंद्रित करून लढत असत. महाराजांचे सैन्य स्त्रियांचा आदर करत. तसेच परप्रांतात युद्धाला गेल्यानंतर धार्मिक स्थळे, स्त्रिया, मुलेबाळे यांना किंवा प्रजेला त्रास दिल्यास महाराज त्या सैनिकांना कडक शिक्षा देत असत. त्यामुळे स्त्रियांचे रक्षण करणारे म्हणून शिवरायांची कीर्ती सर्वत्र पसरली होती. सैनिकांनी दारू पिऊ नये, रयतेची लूट करू नये, अशी सैनिकांना सक्त व कडक ताकीद असे. सैनिकांचा पगार वेळच्या वेळी मिळत असे.