राज्यकारभाराची घडी बसवली

मराठ्यांचे आरमार

views

3:11
मराठ्यांचे आरमार: आरमार म्हणजे युद्धनौकांचे तांडे होय. युद्धनौका म्हणजे लढाऊ जहाजे. लढाऊ जहाजांचे एकत्र तांडे म्हणजे आरमार होय. पायदळ घोडदळाप्रमाणेच मराठ्यांच्या आरमाराकडे शिवछत्रपतींनी विशेष लक्ष दिले. त्यांनी ते आरमार सुसज्ज व सामर्थ्यशाली केले. कारण मुघल व विजापूरकर हे शिवरायांचे जमिनीवरील शत्रू होते. मात्र जमिनीवरील शत्रूसारखेच समुद्रावरही महाराजांना शत्रू होते. त्यामध्ये सिद्दी, पोर्तुगीज व इंग्रज हे प्रमुख होते. शिवरायांनी त्यांचा बंदोबस्त करण्यासाठीच आरमारदल उभारले होते. मराठ्यांचे व मध्ययुगीन भारताचे हे पहिले आरमार होय. या अर्थाने शिवराय हे भारतीय आरमाराचे जनक किंवा निर्माणकर्ते मानले जातात. शिवरायांनी युद्धनौका बांधायचे कौशल्य परदेशातील लोकांकडून आपल्या लोकांना शिकवले. पुढे आपल्यातील लोक युद्धनौका बांधू लागले. १६६४ मध्ये महाराजांनी सिंधुदुर्ग हा किल्ला बांधला. किल्ले: महाराजांच्या काळात किल्ल्यांना अतिशय महत्त्व असे. राज्याच्या संरक्षणासाठी किल्ल्यांचा फार उपयोग होई. ज्याचे किल्ले त्याचे राज्य अशी परिस्थिती त्यावेळी होती. अशा परिस्थितीत महाराजांच्या स्वराज्यात लहान-मोठे असे सुमारे तीनशे किल्ले होते.