राज्यकारभाराची घडी बसवली

हेर खाते

views

4:11
हेर खाते: शिवरायांच्या लष्करी व्यवस्थेत हेर खाते होते. स्वराज्य स्थापनेच्या कार्यात शिवरायांच्या पराक्रमी मावळ्यांबरोबरच त्यांच्या गुप्तहेर खात्याचासुद्धा अत्यंत महत्त्वाचा सहभाग होता. शत्रूच्या हालचाली आणि गुप्त कारवाया तसेच शत्रू प्रदेशातील संपन्न शहरे, खजिने ठेवलेल्या जागा, स्वारीसाठी जाण्याचा व येण्याचा मार्ग इ. गोष्टींची गुप्तहेरांमार्फत खडानखडा माहिती मिळवून शिवरायांनी अनेक धाडसी मोहिमा केल्या. सुरतेसारखे शत्रूचे संपन्न शहर लुटले. छत्रपती शिवरायांचे गुप्तहेर खाते अतिशय कार्यक्षम होते. मुलकी व्यवस्था: स्वराज्यातील मुलकी म्हणजे नागरी व्यवस्थाही शिवरायांनी चोख ठेवली होती. स्वराज्यात एकूण बारा सुभे होते. सुभा म्हणजे प्रांत होय. सुभ्यावर सुभेदार हा अंमलदार असे. सुभ्याचे काही विभाग असत, त्यांना परगणा म्हणत. एका परगण्यात अनेक गावे असत. प्रत्येक गावातील व्यवहार पाहण्यासाठी पाटील व कुलकर्णी असत. शिवरायांनी अष्टप्रधान मंडळ बनविले असले तरी राज्याचा कारभार शिवराय स्वत: बघत. अधिकाऱ्यांच्या नेमणुका ते स्वत: करत. या नेमणुका करताना ते अतिशय काळजी घेत असत. योग्य मोबदला हे शिवरायांचे तत्त्व होते, प्रधानांना शिवराय कामे नेमून देत. स्वराज्याचा खजिना नेहमी द्रव्याने भरलेला असे पण त्याचा वापर फक्त आणि फक्त स्वराज्याच्या कामासाठीच केला जात असे. अशा प्रकारे शिवरायांनी स्वराज्याची घडी अतिशय व्यवस्थित बसविली होती. शिवरायांचा राज्यकारभारही अतिशय चोख होता.