मानवी वस्ती

प्रस्तावना

views

3:47
प्रस्तावना: मुलांनो, आज आपण मानवी वस्ती या विषयाचा अभ्यास करणार आहेत. सुरुवातीच्या काळात मानव झाडांचे लाकूड, काड्या, पालापाचोळा यांपासून घर तयार करून राहत होता. नंतर मानवाने माती, दगड यांपासून घरे तयार केली. अशाप्रकारे घरांचा विकास करत विज्ञानयुगात तर मानवाने निवाऱ्याच्या बांधकामाच्या साधनात मोठी प्रगती केली. आजच्या काळातील माणूस घरं बांधण्यासाठी सिमेंट, वाळू/रेती, विटा, लोखंड यांचा वापर करून मोठ – मोठ्या इमारती बांधू लागला आहे. तर मुलांनो, आता मी तुम्हाला एक चित्र दाखवतो, त्या चित्रात तुम्ही कोठे कोठे मानवी वस्ती तयार करू शकाल आणि त्या चित्रात दाखवलेल्या वस्त्या तुम्ही त्या त्या ठिकाणीच का दाखवल्या त्याचे काय कारण असावे ते सांगा. तुमच्या लक्षात हेही आलेच असेल की, कमी विकासाकडून अधिक विकसित वस्ती असा क्रम लावायचा तर तो आदिवासी पाडा, ग्रामीण वस्ती, नगर, शहर असा असेल.