मानवी वस्ती

रेषाकृती वस्ती

views

3:37
रेषाकृती वस्ती : मुलांनो, रेषाकृती वस्ती हा देखील एक वस्तीप्रकार आहे. रेषाकृती वस्त्या, रस्ता, लोहमार्ग, नदी, कालवा, समुद्रकिनारा, पर्वतीय प्रदेशाचा पायथा या भागात आढळतात. आकृतीत दाखवल्याप्रमाणे या प्रकारची वस्ती अरुंद आकाराची व सरळ रेषेत असते. मुलांनो, आतापर्यंत आपण मानवाची वस्ती कशी तयार होते आणि कशी विकसित होते हे बघितलं. वस्तीत कशाप्रकारे सुविधा उपलब्ध असतात हेही आपण बघितलं. आता आपण मानवी वस्तीच्या स्थानावर परिणाम करणारे घटक कोणते ते या तक्त्यात पाहू. मुलांनो, मानवी वस्तीच्या स्थानावर प्रामुख्याने प्राकृतिक, सांस्कृतिक आणि आर्थिक हे परिणाम करणारे घटक आहेत.