मानवी वस्ती

भौगोलिक स्पष्टीकरण: निवाऱ्याच्या साधनांतील प्रगती

views

3:42
भौगोलिक स्पष्टीकरण: निवाऱ्याच्या साधनांतील प्रगती : मुलांनो, पूर्वीच्या काळातील घरे ही मातीची होती. गावाकडे आजही मातीपासून बनवलेली घरे दिसतात. आधी परिसरातील साधन सामग्रीचा वापर करून, घरे बांधून मानव राहू लागला. विज्ञानयुगात तर मानवाने निवाऱ्याच्या साधनात मोठी प्रगती केली. परिस्थितीनुसार तो मोठमोठया इमारती बांधून राहू लागला. वस्तीमुळे मानवाला स्थैर्य मिळाले. ग्रामीण वस्ती ही मानवी संस्कृतीतील स्थैर्याची पहिली पायरी आहे. वस्त्यांच्या विकासादरम्यानच्या प्रक्रिया: मुलांनो, ग्रामीण व नागरी वस्त्यांचा कायापालट आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे होत असतो, हे तुम्ही स्वतः अनुभवत आहात. विज्ञानतंत्रज्ञानाच्या नवीन – नवीन शोधांमुळे मानव आपल्या जीवनात किती प्रगती करत आहे. उदाहरणार्थ स्वतः बँकेत न जाता ATM वापरून पैसे काढणे, एकाच जागेवर बसून रेल्वेची, विमानाची तिकिटे घेणे कोणत्याही देशाची माहिती नेटवरून मिळविणे इत्यादी. मुलांनो, वस्तीनिर्माण प्रक्रियांच्या दरम्यान सर्वप्रथम जागा, पाणी आणि तेथील हवामान या गोष्टींचा विचार केला जातो. या तिन्ही गोष्टी वस्ती निर्माण करण्यासाठी अनुकूल असतील तर लोक तेथे वस्ती करतात आणि पुढे लोकसंख्या वाढत गेली की त्यांच्या गरजा भागविण्यासाठी म्हणून वस्तीचा विकास सुरु होतो.