मानवी वस्ती

भौगोलिक स्पष्टीकरण

views

3:29
भौगोलिक स्पष्टीकरण: मुलांनो, आपण वेगवेगळ्या प्रकारच्या वस्त्यांची चित्रे पाहिली होती. त्या चित्रांवरून तुमच्या लक्षात आले असेल की, त्या चित्रांमधील काही भाग विकसित आहे तर काही भाग खूप कमी विकसित आहे. ज्या भागात लोकांना पाण्याची उपलब्धता, सुसह्य हवामान, सुपीक जमिनी उपलब्ध झाल्या त्याच ठिकाणी मानवी वस्त्या विकसित झाल्या. समुद्राच्या किनारी राहणाऱ्या कोळी लोकांनी मासेमारी म्हणजेच मत्स्यव्यवसाय सुरु केला. त्यांच्या वस्तीला कोळीवाडा असे नाव पडले. ग्रामीण वस्ती म्हणजे ज्या मानवी वस्तीमधील बहुसंख्य लोकांचे मूळ व्यवसाय स्थानिक, नैसर्गिक साधनसंपत्तीशी निगडित असतात, उदा. शेती, मासेमारी, खाणकाम इत्यादी, अशा वस्तीला ग्रामीण वस्ती म्हणतात. ग्राम म्हणजे गाव. गावाकडील लोकांचा मुख्य व्यवसाय हा शेतीच असतो. धार्मिक, ऐतिहासिक, व्यापारी, शैक्षणिक, पर्यटन व प्रशासकीय कारणांमुळे हळूहळू ग्रामीण वस्तीतून तयार झालेल्या या नागरी वस्तीचे रूपांतर शहरात होते. तसेच मोठया प्रमाणात लोकसंख्या आणि इतर सोयीसुविधांमध्ये वाढ होत जाते. आणि यामुळे या शहरांचे रूपांतर महानगरात होते.