पर्यावरण आणि आपण

जंगलतोड

views

5:21
जंगलतोड: मुलांनो आता आपण जंगलतोडीविषयी थोडी माहिती करून घेऊया. जगात सर्वात जास्त लोकसंख्या चीन या देशाची आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर आपला भारत देश आहे. आपल्या देशाची लोकसंख्या सुमारे १२० कोटी इतकी आहे. तर संपूर्ण जगाची लोकसंख्या सुमारे सहाशे कोटींच्या आसपास आहे. संपूर्ण जगाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. उदा: पूर्वी शेतीतून वर्षाला एक किंवा दोनच पिके घेतली जात असत. परंतु अलिकडीच्या काळात वर्षाला तीन चार पिके घेतली जातात. त्यामुळे अधिकाधिक जमीन व जलस्त्रोत यांचा वापर मानव करू लागला आहे. त्यामुळे जमिनीची व पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात भासू लागली आहे. तसेच मानव नवीन सुख-सोयी उपलब्ध करून घेऊ लागला आहे. सांगा पाहू, मुलांनो, जवळजवळ आपल्या सर्वांच्याच घरी वर्तमानपत्र येते. आपण वर्तमानपत्रांतून बातम्या वाचतो, रेडिओवर ऐकतो तसेच टी.व्ही वर पाहतो, की विविध प्रकारचे प्राणी, पक्षी, वनस्पतींचे अस्तित्व धोक्यात आले आहे. म्हणजेच त्या वनस्पती प्राणी, पक्षी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. मग आता अशाच बातम्यांच्या आधारे आपण हा तक्ता पूर्ण करायचा आहे. मुलांनो, या तक्त्यावरून आपल्या लक्षात येईल की मानवाच्या कृतींमुळे पर्यावरणातील सजीवांवर परिणाम होत आहे. त्यामुळे जैवविविधता नष्ट होऊ लागली.