पर्यावरण आणि आपण

सांगा पाहू

views

3:50
सांगा पाहू, मुलांनो, ही पाहा एक अन्नसाखळी. एक सजीव दुसऱ्या सजीवावर अन्नासाठी अवलंबून असणे यालाच अन्नसाखळी म्हणतात. तुमच्या समोरच्या अन्नसाखळीत पहिला घटक दाखविला नाही. सरळ दुसरा म्हणजे नाकतोडा व तिसरा म्हणजे चिमणी (पक्षी) दाखविला आहे. मग आता या अन्नसाखळीचे नीट निरीक्षण करा आणि माझ्या प्रश्नांची उत्तरे दया. पर्यावरण संतुलन राखण्याची गरज: मुलांनो, आपण पाहिले की मानव आपल्या प्रगतीसाठी आणि सुख सोयींसाठी निसर्गातील विविध घटकांचा मोठ्या प्रमाणावर वापर करीत आहे. त्यामुळे हवा, पाणी, जमीन अशा सर्व ठिकाणी मोठे बदल घडून येत आहेत. तसेच या अजैविक म्हणजे निर्जीव घटकांचे प्रदूषण होत आहे. त्यामुळे या घटकांवर त्याचा फार मोठा परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. पृथ्वीवरील जैविक घटक वेळोवेळी नामशेष किंवा नष्ट होत असतात. सध्याच्या काळात ही प्रक्रिया खूप वेगाने होत आहे. त्यामुळे याचा सर्व जीवसृष्टीला धोका निर्माण होत आहे. यासाठी मुलांनो पर्यावरणाचा समतोल राखणे खूप गरजेचे आहे. कोणत्याही सजीवाची संख्या खूप कमी वा खूप जास्त असून चालणार नाही. ती प्रमाणबद्ध असणे गरजेचे आहे. माहीत आहे का तुम्हांला? मुलांनो, आपण पाहिले की प्रत्येक सजीव हा कोणत्या ना कोणत्या दुसऱ्या सजीवावर अवलंबून असतो. त्यामुळे जर विविध प्राणी किंवा वनस्पती हळूहळू नामशेष झाले, तर अन्नसाखळ्यांमधील अनेक कड्या नष्ट होतील. त्याचा परिणाम म्हणून पृथ्वीवरील समतोल कोलमडल्याशिवाय किंवा बिघडल्याशिवाय राहणार नाही, असे अनेक शास्त्रज्ञांचे मत आहे.