पर्यावरण आणि आपण

आपल्या गरजा आणि पर्यावरण

views

4:13
आपल्या गरजा आणि पर्यावरण: मुलांनो, आपल्या अनेक प्रकारच्या गरजा आहेत, त्यात अन्न, वस्त्र, निवारा या आपल्या मूलभूत गरजा आहेत. त्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण निसर्गातील अनेक गोष्टींचा वापर करीत असतो. उदा: निवारा ही एक आपली गरज आहे. निवारा म्हणजेच घर बनविण्यासाठी आपण निसर्गातील लाकूड, माती, पाणी, जमीन यांसारख्या अनेक गोष्टींचा वापर करीत असतो. उदा: अन्नधान्याची पिके विशिष्ट ऋतूंतच येतात. त्यामुळे त्या ऋतूंत त्यांचे भरघोस उत्पन्न घेऊन ती वर्षभरासाठी पुरेल असे साठवून ठेवतो. मधमाशांपासून मिळणारे मध हे आपल्याला कधीतरी मिळते. तो आपण साठवून ठेवतो. आणि त्याचा गरजेनुसार वापर करतो. उन्हाळ्यात येणारा आंबा आपल्याला वर्षभर खाता यावा, म्हणून आपण आंब्याचे लोणचे करतो. आपण सर्व निर्धार करूया! मुलांनो, आजपासून आपण असे ठरवू की, मी कोणतीही कृती करेन त्यातून पर्यावरणाचे अजिबात नुकसान होणार नाही. माझ्यामुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही. वॉटरबॅगमध्ये उरलेले पाणी ओतून न टाकता झाडाला घातलेत, तरी खूप चांगले काम होऊ शकते.