कृषी Go Back पारंपरिक ते आधुनिक कृषी views 4:58 पारंपरिक ते आधुनिक कृषी: मुलानो, आता आपण पारंपरिक ते आधुनिक कृषी संबधित माहिती घेऊया. त्यासाठी ही चित्रे पाहा. सुरूवातीच्या काळात लोक फक्त आपल्या कौंटुबिक उदरनिर्वाहाचा विचार करत. त्यामुळे ते दोन तीन कोंबड्या घरातच पाळत. कारण त्यांच्यापासून मिळणाऱ्या अंड्यावर ते आपल्या कुटुंबाचे पोट भरत असत. नंतर त्यांच्या लक्षात आले की, कोंबड्या विकून, त्यांची अंडी विकून आपण पैसे मिळवू शकतो. म्हणून मग त्यांनी कोंबड्यांना राहण्यासाठी खुराडे तयार केले. नंतरच्या आधुनिक काळात कोंबड्या विकणे, अंडी विकणे हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू केला. कोंबड्यांना खाण्यासाठी वेगळ्या प्रकारचे खाद्य आणले. कोंबड्या स्वच्छ आणि सुरक्षित जागी ठेवण्याची व्यवस्था केली, त्यालाच आपण पोल्ट्रीफार्म असे म्हणतो. तसेच या व्यवसायाला कुक्कुटपालन व्यवसाय म्हणतो. म्हणजेच या सर्व चित्रांतून आपल्याला समजते की, पारंपरिक कृषी पद्धतीत माणसांना व जनावरांना कष्ट करावे लागत होते. परंतु आधुनिक पद्धतीत यंत्राने काम केल्यामुळे माणसाचे कष्ट कमी झाले. तसेच पूर्वीच्या काळी शेतासाठी जी अवजारे वापरली जात होती, ती वापरण्यासाठी देखील माणसाची आणि जनावराची मदत लागत होती. प्रस्तावना पारंपरिक ते आधुनिक कृषी कृषी या सदराखाली येणारे व्यवसाय मत्स्यपालन शेतीचे प्रकार व्यापारी शेती फलोद्यान / फूलशेती कृषिपर्यटन विपणन व्यवस्था