कृषी Go Back फलोद्यान / फूलशेती views 5:09 फलोद्यान / फूलशेती: मंडई बागायती शेतीचा एक उपप्रकार म्हणजे फुलांची व फळांची शेती होय. या शेतीतील फळे व फुले ही मुख्य उत्पादने असतात. ही शेती पारंपरिक तसेच आधुनिक पद्धतीने केली जाते. या शेती क्षेत्राचा आकार लहान असतो. या शेती पद्धतीत प्रत्येक रोपाची काळजी घ्यावी लागते. सेंद्रिय शेती: सेंद्रिय शेती म्हणजे निसर्गचक्राच्या साहाय्याने करावयाची शेती. त्यात नैसर्गिक घटकांचा अधिकधिक पुनर्वापर आणि कृत्रिम घटकांच्या कमीत कमी वापरासह दोन्ही घटकांची सांगड घालणे आवश्यक असते. पिकांची पोषकद्रव्यांची गरज मृदेतून भागवली जात असल्याने वापरल्या गेलेल्या पोषकद्रव्यांचे मृदेतील पुनर्भरण होणे गरजेचे असते. त्यासाठी सेंद्रिय खते तयार केली जातात. ही सेंद्रिय खते तयार कशी होतात, त्यासाठी लागणाऱ्या घटकांविषयी माहिती घेऊ.या सर्व प्रकारचे वनस्पतीजन्यपदार्थ जमिनीत मिसळवून व कुजवून जेव्हा पिके घेतली जातात, त्याला सेंद्रिय शेती पद्धती असे म्हणतात. मुलांनो आता या आकृती मधील छायाचित्रांचे निरीक्षण करून शेतीचे प्रकार ओळखून माहिती करून घेऊया. प्रस्तावना पारंपरिक ते आधुनिक कृषी कृषी या सदराखाली येणारे व्यवसाय मत्स्यपालन शेतीचे प्रकार व्यापारी शेती फलोद्यान / फूलशेती कृषिपर्यटन विपणन व्यवस्था