कृषी Go Back कृषी या सदराखाली येणारे व्यवसाय views 4:34 कृषी या सदराखाली येणारे व्यवसाय: आता आपण कृषीक्षेत्रात येणाऱ्या विविध व्यवसायांची ओळख करून घेऊया. तसेच या व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पादनांचा आपल्या रोजच्या जीवनात कसा वापर होतो, ते पाहूया. पशुपालन :- या विभागात शेतीसाठी महत्त्वाचा असलेला व्यवसाय म्हणजे पशुपालन होय. गुरेपालन :- गुरेपालन हा मिश्र शेतीचा अविभाज्य भाग आहे. गाय, म्हैस, बैल, रेडा इत्यादी जनावरांचे शेतीसाठी पालन केले जाते. शेळीपालन व मेंढीपालन :- शेळीपालन व मेंढीपालन हा एक पारंपरिक व्यवसाय आहे. शेळीपालन व मेंढीपालन हे व्यवसाय डोंगराळ, निमओसाड, कोरड्या हवामान प्रदेशात केले जातात. कुक्कुटपालन :- केवळ शेतीव्यवसायपूरक जोडधंदा असे या व्यवसायाचे आजचे स्वरूप राहिलेले नाही, तर भरपूर भांडवलाची गुंतवणूक करून मोठे उत्पन्न मिळवून देणारा एक स्वतंत्र धंदा म्हणून आजकाल त्याच्याकडे पाहिले जात आहे. मधमाशीपालन : मधमाशी पालन हा शेतीवर आधारित एक उपक्रम आहे, शेतकरी अतिरिक्त उत्पन्न मिळवण्यासाठी हा उद्योग करू शकतात. प्रस्तावना पारंपरिक ते आधुनिक कृषी कृषी या सदराखाली येणारे व्यवसाय मत्स्यपालन शेतीचे प्रकार व्यापारी शेती फलोद्यान / फूलशेती कृषिपर्यटन विपणन व्यवस्था