मूलभूत हक्क भाग १

समानतेचा हक्क

views

3:08
समानतेचा हक्क: सर्वात प्रथम आहे समानतेचा हक्क. समानतेच्या हक्कानुसार राज्याला भारतीय नागरिकांमध्ये उच्च-नीच, श्रेष्ठ-कनिष्ठ, गरिब-श्रीमंत, स्त्री-पुरुष असा भेद करून कोणालाच वेगळी वागणूक देता येत नाही. कायदयापुढे सर्वजण सारखेच असतात. कायदयामुळे सर्वाना समान संरक्षण मिळते. माहीत आहे का तुम्हाला?: मुलांनो, विषमता जोपासणाऱ्या, समाजात फूट पाडणाऱ्या आणि नागरिकांमध्ये भेद करणाऱ्या पदव्या राज्याला देता येत नाहीत. परंतु समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये गौरवास्पद कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना मात्र शासन पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण यांसारख्या पदव्या देते. साहित्य, सामाजिक कार्य, खेळ, विज्ञान, संगीत अशा क्षेत्रात सर्वोच्च कामगिरी करणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर या व्यक्तींना हा पुरस्कार मिळाला आहे. भारतरत्न हा आपल्या देशातील सर्वात मोठा नागरी सन्मान आहे. डॉ.ए.पी.जी अब्दुल कलाम यांना तो मिळाला होता.