मूलभूत हक्क भाग १

स्वातंत्र्याचा हक्क

views

4:34
स्वातंत्र्याचा हक्क : संविधानाने भारतातील प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्याचा हक्क दिला आहे. व्यक्तीचा सर्वांगीण विकास व्हायचा असेल तर त्याला स्वातंत्र्य मिळणे आवश्यक आहे. 1. भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य नागरिक म्हणून आपल्याला आहे. 2. शांततापूर्वक एकत्र येण्याचे आणि सभा घेण्याचे स्वातंत्र्य आहे. 3. संस्था व संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य आहे. 4. भारताच्या प्रदेशात कोठेही फिरण्याचे किंवा वास्तव्य करण्याचे स्वातंत्र्य आहे. आपल्या आवडीचा उद्योग व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य: पूर्वी भारतात वडिलांचा व्यवसाय मुले पुढे चालवत. तेव्हा व्यवसाय वंशपरंपरेने ठरत असे. म्हणजे सुताराचा मुलगा सुतार, लोहाराचा मुलगा लोहार अशी व्यवस्था होती. त्याकाळी त्यांना व्यवसाय बदलण्यावर निर्बंध असत. परंतु आता परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. भारतीय संविधानाने प्रत्येक व्यक्तीला स्वत;च्या आवडीचा उद्योग असे व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य बहाल केले आहे.