मूलभूत हक्क भाग १

माहीत आहे का तुम्हाला ?

views

3:30
माहीत आहे का तुम्हाला ? संविधानाने आपल्याला जे हक्क दिले आहेत. ते हक्क आपल्यापासून कुणीही हिसकावून घेऊ शकत नाही किंवा त्यावर कुणीही आक्रमण करू शकत नाही. पण म्हणून आपण त्यांचा वापर चुकीच्या मार्गाने करता कामा नये. शोषणाविरुद्धचा हक्क : व्यक्तीचे कोणत्याही प्रकारे शोषण होऊ नये यासाठी संविधानाने बरेच हक्क आपल्याला दिले आहेत. शोषण थांवण्यासाठी शोषणाला बळी न पडण्याचा, आपले शोषण किंवा पिळवणूक होऊ न देण्याचा हक्क म्हणजे शोषणाविरुद्धचा हक्क होय. संविधानाने सर्व प्रकारच्या पिळवणूकीवर बंदी घातली आहे. बालकांचे शोषण थांबवण्यासाठी १४ वर्षाखालील बालकांना धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास शासनाने बंदी घातली आहे. तर मुलांनो अशाप्रकारे भारताच्या संविधानातील समानता, स्वातंत्र्य व शोषणाविरुद्धच्या हक्कांची माहिती आपण या पाठात घेतली. पुढील पाठात उर्वरित हक्कांची माहिती