मूलभूत हक्क भाग २

सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क

views

3:30
सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क: मुलांनो आपल्याला माहीत आहे की आपला देश एक सांस्कृतिक विविधता असणारा देश आहे. वर्षातील ३६५ दिवसात आपण भरपूर सण आणि उत्सव साजरे करतो. प्रत्येक धर्माचे सण, उत्सव, आहार वेगवेगळे आहेत. प्रत्येकाची जीवनपद्धती वेगवेगळी आहे. आपण वेगवेळ्या धर्मांचे लग्न समारंभ पाहतो. त्यांच्यामध्येही आपल्याला खूप वेगळेपण आढळते. मुलांनो चला आपण काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करूया. भारत हा विविधता असणारा देश आहे. इथे प्रत्येक गावात, शहरात, खेड्यात विविध भाषा बोलल्या जातात. भारतामध्ये १६५२ भाषा बोलल्या जातात त्यांपैकी संविधानाने २२ भाषांना मान्यता दिली आहे. भारतीय नोटांवर १००रु, १०रु, २०रु ह्या सर्व नोटांवर आपल्याला १५ भाषा पाहावयास मिळतील.