मूलभूत हक्क भाग २

सरकारी अधिकाऱ्याची ही प्रतिक्रिया योग्य की अयोग्य

views

2:05
सरकारी अधिकाऱ्याची ही प्रतिक्रिया योग्य की अयोग्य: उदा: निराधारांसाठी असणाऱ्या एका योजनेचा आपल्याला लाभ मिळावा म्हणून सर्व आवश्यक कागदपत्रे सादर करणाऱ्या महिलेला, ‘तू निराधार दिसत नाहीस’ असे म्हणून लाभ नाकारणाऱ्या सरकारी अधिकाऱ्याची ही कृती योग्य आहे की अयोग्य? नागरिकांना मिळालेले मूलभूत हक्क सुरक्षित राहावेत म्हणून संविधानाने बऱ्याचशा तरतुदी केल्या आहेत. अधिक जागरूक, सक्रीय व जबाबदार नागरिक यातून तयार होतात. परंतु काही नागरिक हे फक्त आपल्या हक्कांबाबतच जागरूक असतात. जेव्हा कर्तव्याची वेळ येते तेव्हा ते हात झटकतात. म्हणून मूलभूत हक्कांचा विचार करताना आपल्याला आपल्या कर्तव्यांचेही भान ठेवावे लागते. याचा अभ्यास आपण पुढील पाठात करू.