बँक व सरळव्याज Go Back क्रेडिट, ए.टी.एम/ डेबिट कार्ड views 5:16 क्रेडिट, ए.टी.एम/ डेबिट कार्ड: मुलांनो, बँकेत खाते उघडल्यानंतर बँक आपल्याला बँकेचे पासबुक, चेकबुक, एटीएम कार्ड, मोबाईल बँकिंग, एस.एम.एस. बँकिंग, इंटरनेट बँकिंग या सर्व सुविधा देते. त्याचप्रमाणे बँकेत न जाता कधीही, कुठेही व कोणत्याही (ATM) एटीएम केंद्रातून आपण पैसे काढू शकतो. रोख रकमेशिवाय व्यवहार करण्यासाठी क्रेडिट कार्ड व डेबिट कार्ड वापरू शकतो. ही कार्डे विनंतीवरून त्या बँकेच्या खातेदारास मिळू शकतात. पण मुलांनो, आता तंत्रज्ञानाने इतकी प्रगती केली आहे, की इंटरनेटच्या मदतीने आणि इंटरनेट बँकिंगने तुम्ही यातील बरेचसे व्यवहार घरी बसूनच करू शकता. त्यासाठी तुम्हाला बँकेमध्ये जाऊन रांगेत उभे राहण्याची गरज नसते. बँकेत ठेवलेल्या किंवा बँकेकडून कर्जदरास दिलेल्या रकमेला ‘मुद्दल’ असे म्हणतात. मुद्दल ज्या कालावधीसाठी वापरली जाते त्या कालावधीला मुदत असे म्हणतात. बँक ठेवीदारांना बँकेत रक्कम ठेवल्याबद्दल काही रक्कम मोबदला देते किंवा कर्जदाराकडून कर्ज दिल्यानंतर बँक मोबदला घेते. त्याला व्याज असे म्हणतात. व्याजाचा दर द.सा.द.शे असतो. याचा अर्थ दर सालासाठी म्हणजेच प्रत्येक वर्षासाठी दर शंभर रुपयासाठी द्यायचे व्याज होय. आता आपण मुद्दल ,दर, मुदत या गोष्टी काही उदाहरणातून अधिक समजून घेऊ. बँक व बँकेतील खाती क्रेडिट, ए.टी.एम/ डेबिट कार्ड उदाहरण जाणून घेऊया जाणून घेऊया 2