बँक व सरळव्याज Go Back उदाहरण views 3:46 उदाहरण 3) आकाशने द.सा.द.शे 8 दराने बँकेत 25000 रुपये 3 वर्षांसाठी ठेव म्हणून ठेवले, तर त्याला प्रत्येक वर्षी किती व्याज मिळेल? एकूण किती व्याज मिळेल? उत्तर: मुलांनो, पाहा या उदाहरणात आकाशने रू 25000 रुपये बँकेत ठेवले आहेत. म्हणून त्याचे मुद्दल झाले रू 25000. त्याची मुदत आहे 3 वर्षे. आणि व्याजाचा दर आहे शंभरासाठी रू 8. जर त्याचे मुद्दल वाढले तर त्याला मिळणारे व्याजही वाढेल. हो की नाही? वि: हो सर. शि: पण मग जर 100 रू साठी 8 रुपये व्याज मिळते, तर मग 25000 रुपयांसाठी किती ? त्याच प्रमाणे 3 वर्षाचे व्याज काढण्यसाठी आपल्याला आधी 1 वर्षाचे व्याज काढावे लागेल. तर पहा हे काढण्यासाठी आपण रू. 25,000 वर मिळणारे व्याज ‘χ’ रू असेल असे आपण मानू. मग आता आपण याचे समीकरण मांडू. χ/25000 = 8/100 आता χ ची किंमत काढण्यासाठी दोन्ही बाजूंना 25,000 ने गुणू. म्हणून χ/25000 × 25000 = 8/100 × 25000 χ = 8 × 250 = 2000. म्हणून आकाशला एकूण 2000 रुपये व्याज मिळेल. पण मुलांनो हे झाले एका वर्षाचे व्याज. ह्या एका वर्षाच्या व्याजावरून आपण 3 वर्षाचे व्याज काढू शकतो. 1 वर्षाचे व्याज = 2000रुपये म्हणून 3 वर्षाचे व्याज = 3 × 2000 = 6000 रुपये. तर आकाशला 3 वर्षाचे एकूण 6000रुपये व्याज मिळेल. बँक व बँकेतील खाती क्रेडिट, ए.टी.एम/ डेबिट कार्ड उदाहरण जाणून घेऊया जाणून घेऊया 2