बैजिक सूत्रे – वर्ग विस्तार Go Back वर्गविस्तार views 5:08 वर्गविस्तार : आता काही द्विपदींचा वर्ग विस्तार कसा करायचा ते आपण पाहू. उदा.1) (2x + 3y)2 = (2x) + 2 (2 x) x (3y) + (3y)2 = 4x2 + 6xy +6xy + 9y2 = 4x2 + 12xy + 9y2 या उदाहरणामध्ये (2x +3y)2 या द्विपदीचा विस्तार करायचा आहे. म्हणून विस्तार सूत्राचा वापर केला आहे. उदा.2) (5x - 4)2 = (5x - 4) (5x - 4) = 5x x (5x - 4) – 4 (5x - 4) = 25x2 – 20x – 20x + 16 = 25x2 – 40x + 16 या उदाहरणामध्ये (5x - 4)2 याचा विस्तार केला असता (5x - 4) (5x - 4) झाले. नंतर दुसऱ्या कंसातील प्रत्येक पदाने पहिल्या कंसातील प्रत्येक पदाला गुणले. जसे 5x × (5x–4) –4×(5x – 4). यांचा गुणाकार केला असता तो 25x2 – 20x - 20x + 16 झाला. सरूप पदांची बेरीज केली असता – 20x – 20x = -40 x झाले. म्हणजे इथे आपण विस्तार सूत्र न वापरता प्रत्यक्ष गुणाकार केला आहे. शेवटी उत्तर मिळाले 25x2 – 40x + 16. प्रस्तावना बैजिक राशींचा गुणाकार करून सूत्र तयार करूया वर्गविस्तार (a + b) (a – b) चा विस्तार बैजिक राशींचे अवयव पाडणे