बैजिक सूत्रे – वर्ग विस्तार

बैजिक राशींचे अवयव पाडणे

views

4:29
बैजिक राशींचे अवयव पाडणे: मुलांनो आता आपण बैजिक राशींचे अवयव कशा पध्दतीने पाडतात त्याचा अभ्यास करू. एकपदीचे अवयव – एकपदीचे अवयव पाडताना प्रथम सहगुणकाचे अवयव पाडूया व नंतर चलाचे अवयव पाडूया. उदा. 14 x2y याचे अवयव पाडू. 14 x2y = 2 × 7 X x X x X y येथे 2,7, x, x आणि Y हे 14x2y चे अवयव आहेत. मुलांनो आता अजून काही उदाहरणे सोडवून पाहूया. उदा.1) 24a2b2 चे अवयव पाडा. 24a2b2 (24 चे अवयव पाडून a व b चे अवयव पाडू) = 12 X 2 X a X a X b X b (12 चे अवयव पाडू) = 6 X 2 X 2 X a X a X b X b (6 चे अवयव पाडूया) = 3 X 2 X 2 X 2 X a X a X b X b द्विपदीचे अवयव - द्विपदीचे अवयव पाडताना दिलेल्या द्विपदीतील दोन्ही पदांचे सामाईक अवयव शोधून ते कंसाबाहेर गुणाकाराच्या रूपात लिहून द्विपदीचे अवयव पाडता येतात. उदा. 10x2+15x या द्विपदीचे अवयव पाडूया. = 2 X 5 X x X x + 3 X 5 X x (सामाईक अवयव शोधूया). = 5x (2x + 3) अशाप्रकारे बैजिक राशींचे अवयव पाडता येतात.