लोकशाही

प्रस्तावना

views

4:47
आपण वर्तमानपत्रे किंवा दूरदर्शनवर काही बातम्या वाचतो किंवा ऐकतो. त्या बातम्या आपण पाहू. 1. जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीचा आदेश दिला.2 महापालिका आयुक्तांनी अंदाजपत्रक मांडले.3. वित्त सचिवांचा राजीनामा.4. विभागीय आयुक्त महसुलाचा आढावा घेणार. या बातम्यांमध्ये जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, वित्त सचिव, विभागीय आयुक्त अशा काही पदांचा उल्लेख झाला आहे. या सर्व पदांवरील व्यक्ती या शासनाच्या प्रशासन यंत्रणेतील सनदी अधिकारी असतात.या सनदी अधिकाऱ्यांची काय बरे कामे असतील? तर आज आपण या पाठात सर्व प्रकारच्या सनदी अधिकाऱ्यांची कार्ये व त्यांची प्रशासनातील भूमिका समजावून घेणार आहोत.