लोकशाही

भारतातील नोकरशाहीचे महत्त्व

views

3:46
देशाच्या कार्यकारी मंडळाची भूमिका स्पष्ट करणाऱ्या प्रकरणात आपण पाहिले की प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रीमंडळ नव्या कायदयांचे प्रस्ताव तयार करते, तसेच नवीन धोरणेही ठरवते. आता ही धोरणे फक्त कागदावरती ठरवून ती यशस्वी होणार आहेत का? तर नाही. या धोरणांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणेही खूप गरजेचे असते. शासनाची ठरविलेली धोरणे प्रत्यक्ष कार्यवाहीत आणणारी व कार्यकारी मंडळाच्या नियंत्रणाखाली असणारी एक प्रशासकीय यंत्रणा ‘नोकरशाही’ म्हणून ओळखली जाते.ही नोकरशाही प्रशासकीय दृष्ट्या किती महत्त्वाची व गरजेची आहे ते आपण पाहणार आहोत.कोणत्याही देशाचा विचार केला, तर त्या देशातील शासनसंस्थेला मूलभूत अशी दोन प्रकारची कार्ये पार पाडावी लागतात.1) देशाचे परकीय आक्रमणापासून म्हणजे इतर देश आपल्या देशावर आक्रमण करणार नाहीत यासाठी प्रयत्न करणे व अंतर्गत सुरक्षाविषयक धोक्यापासून संरक्षण करून नागरिकांना सुरक्षित ठेवणे. 2) नागरिकांना विविध प्रकारच्या सेवा पुरवून त्यांचे दैनंदिन जीवन अधिक सुरळीत करणे की ज्यायोगे त्यांना आपला व समाजाचा विकास साधता येईल.यातील पहिल्या प्रकारातील कामासाठी देशाची संरक्षण यंत्रणा सज्ज असते. म्हणजे देशाचा लष्कर विभाग यासाठी काम करतो. तसेच ही सेवा देशाच्या अंतर्गत भागात सुरक्षितता, शांतता व कायदा सुव्यवस्था राहावी यासाठी नागरी सेवेला मदत करतात. त्यातील सेवांना आपण ‘लष्करी सेवा’ म्हणतो. हे झाले पहिल्या कामासाठी तर दुसऱ्या कामासाठी प्रशासकीय यंत्रणा उभी केली जाते. त्यास आपण ‘सनदी सेवा’ म्हणतो. सनदी सेवकांच्या या मोठया यंत्रणेला ‘नोकरशाही’ असेही म्हटले जाते.