भौमितिक रचना

समरूप त्रिकोणाची रचना

views

5:00
एखादी इमारत बांधण्यापूर्वी त्या इमारतीचा आरखडा तयार करतात. शाळेचा परिसर आणि त्याचा नकाशा, इमारत आणि तिचा आराखडा परस्परांशी समरूप असतात. भूगोल, वास्तुशास्त्र, यंत्रशास्त्र इत्यादी क्षेत्रांमध्ये समरूप आकृती काढण्याची गरज असते. त्रिकोणही साधी बंदिस्त आकृती आहे. एका त्रिकोणाच्या बाजू दिल्या असता, त्याच्याशी समरूप असणारा आणि गुणोत्तराची अट पूर्ण करणारा त्रिकोण काढणे. हे लक्षात ठेवा की दोन समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू एकाच प्रमाणात असतात आणि त्यांचे संगत कोन एकरूप असतात. याचा उपयोग करून दिलेल्या त्रिकोणाशी समरूप असणारा त्रिकोण काढता येतो. आता आपण काही उदाहरणे समजून घेऊया. उदाहरण: त्रिकोण ∆ABC ~ ∆PQR, ∆ABC मध्ये AB=5.4 सेमी; BC= 4.2 सेमी, AC= 6 सेमी, AB:PQ = 3:2 तर, ∆ABC आणि ∆PQR काढा.