भौमितिक रचना Go Back दिलेल्या वर्तुळाला त्याबाहेरील दिलेल्या बिंदूतून स्पर्शिका काढणे views 2:19 दिलेल्या वर्तुळाला त्याबाहेरील दिलेल्या बिंदूतून स्पर्शिका कशी काढतात ते आता आपण पाहूया. रचनेच्या पायऱ्या: आता आपण या त्रिकोणांच्या रचना करूया. (आकृती 4.14 दाखवा) 1. केंद्र O असलेले कोणत्याही त्रिज्येचे एक वर्तुळ काढा. 2. वर्तुळाच्या बाह्यभागात P हा एक बिंदू घ्या. 3. आता रेख OP काढा. रेख OP ला लंबदुभाजक काढून मध्यबिंदू M मिळवा. 4. केंद्र M व त्रिज्या OM घेऊन वर्तुळकंस काढा. हा वर्तुळकंस दिलेल्या वर्तुळाला ज्या दोन बिंदूत छेदतो त्याला अनुक्रमे A आणि B असे नाव द्या. 5. केंद्र O पासून रेख OP च्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन वर्तुळाच्या वरच्या व खालील बाजूस एक एक कंस काढा. 6. आता कंपासमधील अंतर न बदलता कंपासचे लोखंडी टोक P बिंदूवर ठेवून पहिल्या कंसाला छेदणारा दुसरा कंस काढून दोन्ही कंसांना छेदणारे दुसरे कंस काढा. दोन्ही कंसांतील छेदन बिंदूमधून एक रेषा काढा. 7. आता बिंदू A व बिंदू P जोडून रेषा PA काढा. तसेच बिंदू B व बिंदू P जोडून रेषा PB काढा. अशाप्रकारे रेषा PA व रेषा PB ह्या वर्तुळाच्या अपेक्षित स्पर्शिका आहेत. समरूप त्रिकोणाची रचना एक शिरोबिंदू असलेली त्रिकोण रचना उदाहरण दिलेल्या वर्तुळाला त्यावरील बिंदूतून स्पर्शिका काढणे दिलेल्या वर्तुळाला त्याबाहेरील दिलेल्या बिंदूतून स्पर्शिका काढणे