संभाव्यता

घटनेची संभाव्यता

views

03:45
घटनेची संभाव्यता: गणिती भाषेत एखाद्या अपेक्षित घटनेची शक्यता दर्शवणाऱ्या संख्येला संभाव्यता असे म्हणतात. संभाव्यता समजण्यासाठी एक सोपा प्रयोग विचारात घेऊ. एका पिशवीत समान आकाराचे चार चेंडू आहेत. त्यांतील तीन चेंडू पांढरे व चौथा चेंडू काळा आहे. डोळे मिटून त्यांतील एक चेंडू काढायचा आहे. काढलेला चेंडू पांढरा असण्याची शक्यता जास्त आहे, हे सहज कळते. घटनेची संभाव्यता पुढील सूत्र वापरून संख्येने किंवा शतमानात दर्शवतात.