महत्त्वमापन

शंकूछेद

views

06:08
आपण पाणी पिण्यासाठी निमुळत्या पेल्याचा (ग्लासचा) वापर करतो. ह्या पेल्याचा आकार, तसेच त्यातील पाण्याचा आकार हे शंकूछेदाचे आकार आहेत. या आकृतीमध्ये एक शंकू पालथा ठेवलेला दाखविलेला आहे. या शंकूचा त्याच्या तळाला समांतर असा छेद घेतला. त्यामुळे झालेल्या दोन भागांपैकी वरच्या भागाचा आकार शंकूचाच आहे. त्या भागाला शंक्वाकृती भाग असे म्हणतात. आणि राहिलेल्या भागाला शंकूछेद (Frustum) म्हणतात. शंकूप्रमाणेच शंकूछेदाचेही पृष्ठफळ व घनफळ काढता येते. त्यासाठी पुढील सूत्रांचा वापर आपण करणार आहोत.