विभाज्य आणि विभाजकता Go Back विभाज्य views 3:44 विभाज्य: भाज्य व भाजक म्हणजे काय हे आपल्याला माहीत आहे. पण विभाज्य म्हणजे काय हे समजून घेऊया. यासाठी खालील उदाहरण पहा. या उदाहरणात 35 हा भाज्य आहे व 7 हा भाजक आहे. आणि 5 हा भागाकार आहे. म्हणजेच 35 या संख्येला ७ ने भाग दिला असता भागाकार 5 येतो व बाकी शून्य उरते. विभाज्य :- तर जेव्हा भागाकारात बाकी शून्य उरते तेव्हा भाजकला विभाजक आणि भाज्याला विभाज्य असे म्हणतात. किंवा जेव्हा एका संख्येला दुसऱ्या संख्येने नि:शेष भाग जातो तेव्हा ती संख्या दुसऱ्या संख्येने विभाज्य आहे असे म्हणतात. या उदाहरणात 35 या भाज्यास 7 या भाजकाने भागल्यास भागाकार 5 व बाकी शून्य येते. म्हणजे 35 ही संख्या 7 ने विभाज्य आहे. शि: आता समजा आपण 21 ÷ 5 घेतले तर मला सांगा 20 ही संख्या 5 ने विभाज्य आहे का? वि: नाही सर, कारण जर 21 ला 5 ने भाग दिला तर 4 चा भाग लागतो आणि बाकी 1 उरते. शून्य उरत नाही. म्हणून 20 ही संख्या 5 ने विभाज्य नाही. शि: अगदी बरोबर. आता मला सांगा 48 चॉकलेटं आहेत तर त्याचे ६ – ६ चे गट तयार होतील का? वि: सर जर आपण 48 ला 6 ने भागले तर 8 चा भाग लागतो, आणि बाकी काहीच उरत नाही. म्हणजे आपण 48 चे 6-6 चे एकूण 8 भाग करू शकतो. म्हणून या उदाहरणात 48 हा विभाजक आणि 6 विभाज्य आहे. प्रस्तावना विभाज्य विभाज्यतेच्या कसोट्या विभाज्यतेची दुसरी कसोटी मूळ संख्या आणि संयुक्त संख्या सहमूळ संख्या इराटोस्थेनिसची पद्धत