विभाज्य आणि विभाजकता

सहमूळ संख्या

views

3:48
सहमूळ संख्या : ज्या दोन संख्यांना 1 हा एकच सामाईक विभाजक असतो त्या संख्यांना सहमूळ संख्या असे म्हणतात. उदा: प्रथम आपण 4 व 9 या संख्यांचे चे सर्व विभाजक लिहू. तर 4 चे विभाजक आहेत 1,2,4 आणि 9 चे विभाजक आहेत 1,3,9. पहा : या दोन्ही संख्यांच्या विभाजाकांमध्ये 1 ही एकच संख्या आहे जी सामाईक आहे. म्हणून 4 व 9 ह्या सहमूळ संख्या आहेत. आता 8 आणि 11 या संख्यांचे विभाजक काढू. तर 8 चे विभाजक आहेत 1, 2, 4, आणि 8 आणि 11 चे विभाजक आहेत 1 आणि 11. पाहिलंत, यामध्येही 1 ही एकच संख्या सामाईक आहे. म्हणून 8 आणि 11 याही संख्या सहमूळ संख्या आहेत. आता आपण आणखी एक उदाहरण पाहू. आपण 6 व 18 या सहमूळ संख्या आहेत का ते पाहू. 6 च्या विभाजक संख्या आहेत 1, 2, 3, 6 आणि 18 च्या विभाजक संख्या आहेत 1, 2, 3, 6, 9, 18. मग मला सांगा आता यामध्ये सामाईक संख्या कोणकोणत्या आहेत? वि: सर यात सामाईक संख्या आहेत 1,2,3,6. शि: बरोबर आहे.! मग सांगा 6 व 18 या सहमूळ संख्या आहेत का? वि: नाही सर . या संख्या सहमूळ संख्या नाहीत. कारण यामध्ये 1 च्या व्यतिरिक्त जास्त सामाईक संख्या आहेत. शि : अगदी बरोबर !