विभाज्य आणि विभाजकता Go Back इराटोस्थेनिसची पद्धत views 3:44 मूळ संख्या शोधण्याची इराटोस्थेनिसची पद्धत : इराटोस्थेनिस हा गणिती इस पूर्वी सुमारे 250 वर्ष या काळात ग्रीस मध्ये होऊन गेला. त्याने मूळ संख्या शोधण्याची एक पद्धत शोधून काढली तिला इराटोस्थेनिसची चाळणी म्हणतात. या पद्धतीने 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या कशा शोधतात ते पाहू. • 1 ही मूळ संख्या नाही व संयुक्त संख्याही नाही म्हणून तिच्या भोवती अशी खूण करा. • 2 ही सममूळ संख्या आहे म्हणून त्या भोवती अशी खूण करा. • नंतर 2 ने विभाज्य असणाऱ्या सर्व संख्यावर तिरकी रेषा मारा. पाहा जवळ जवळ निम्म्या संख्या मूळसंख्या नाहीत. (उदा. 2, 4, ६, 8, 10, १२, 14, 16, 18, 20, 22, 24, 28, ३०, 32, 34, 36, ३८,40,42,४४,46,48,50,52,५४,56,58,60,62,६४,६६,68,70,72,74,76,78,80,८२,84,८६,८८,90,92,94,96,98,100) • 2 नंतर येणारी व बाद न झालेली 3 ही पहिली संख्या आहे. ती मूळ संख्या आहे. • आता 3 भोवती वर्तुळ काढा. आणि 3 ने विभाज्य असणाऱ्या सर्व संख्यावर तिरपी रेषा मारा. (उदा. 3,६,9,१२,१५,18,21,24,27,३०,३३,36,39,42,45,48,41,५४,57,60,63,६६,६९,72,75,78,८१,84,८७,90,९३,96,99) • पाहा 3 नंतर बाद न झालेली 5 ही पहिली संख्या आहे. ती मूळ संख्या आहे. • नंतर 5 भोवती वर्तुळ काढा. आणि 5 ने विभाज्य असणाऱ्या सर्व संख्यावर तिरपी रेषा मारा.(उदा. 5,10,१५,20,25,३०,35,40,45,50,55,60,65,70,75,80,८५,90,95,100) • पाहा 5 नंतर बाद न झालेली 7 ही पहिली संख्या आहे. ती मूळ संख्या आहे. • आता 7 भोवती वर्तुळ काढा. आणि 7 ने विभाज्य असणाऱ्या सर्व संख्यावर तिरपी रेषा मारा. (उदा. ७,14,21,28,35,42,49,56,63,70,७७,84,91,98) प्रस्तावना विभाज्य विभाज्यतेच्या कसोट्या विभाज्यतेची दुसरी कसोटी मूळ संख्या आणि संयुक्त संख्या सहमूळ संख्या इराटोस्थेनिसची पद्धत