कार्य आणि ऊर्जा

ऊर्जेची रूपे

views

3:58
यांत्रिक ऊर्जा , उष्णता ऊर्जा , प्रकाश ऊर्जा, रासायनिक ऊर्जा व विद्युत ऊर्जा ही ऊर्जेची विविध रूपे आहेत. यांत्रिक उर्जा- यांत्रिक कार्य करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उर्जेला यांत्रिक उर्जा असे म्हणतात. स्थितिज ऊर्जा व गतीज ऊर्जा असे यांत्रिक ऊर्जेचे दोन प्रकार आहेत. स्थितीज उर्जा- वस्तुत साठवलेल्या ऊर्जेला स्थितीज ऊर्जा म्हणतात. पदार्थाच्या विशिष्ट स्थितीमुळे आणि स्थानामुळे ही स्थितिज ऊर्जा त्यांच्यात साठविली जाते. गतीज उर्जा- एखाद्या वस्तूला गती देण्यासाठी वापरलेल्या उर्जेला गतीज उर्जा म्हणतात.