कार्य आणि ऊर्जा

ऊर्जा स्रोत

views

3:21
प्रत्येक कार्यासाठी उर्जेची गरज असते . आणि ही ऊर्जा आपल्याला सूर्यापासून वेगवेगळ्या प्रकारे मिळत असते. ऊर्जा मिळवण्याची साधने म्हणजेच ऊर्जा स्त्रोत होय. आणि ऊर्जा मिळण्याचा सर्वात प्रमुख स्रोत म्हणजे सूर्य. ऊर्जा स्रोताचे दोन प्रकारात वर्गीकरण करता येईल 1) पारंपरिक ऊर्जा स्रोत आणि अपारंपरिक उर्जा स्रोत. पारंपरिक ऊर्जेमध्ये अलीकडच्या काळातील जीवाश्म इंधन जसे पेट्रोल, डीझेल, नैसर्गिक वायू यांचा समावेशही होतो. म्हणजेच हे सर्व आपल्याला निसर्गातून मिळतात. हे ऊर्जास्रोत आपल्याला पुन्हा निर्माण करता येत नाहीत. अपारंपरिक उर्जास्रोत- या ऊर्जा स्रोतांचा वापर पूर्वपरंपरेने करण्यात येत नव्हता. हे ऊर्जा स्रोत अक्षय व अखंड म्हणजे न संपणारे आहेत. आणि ते विविध स्वरुपात पुन्हा पुन्हा वापरता येतात.