पृथ्वी आणि वृत्ते Go Back रेखावृत्ते views 3:21 पृथ्वीवर अशा अर्धवर्तुळाकार रेषा काढता येतात. त्यालाच रेखावृत्त म्हणतात. पृथ्वीच्या गोलावरील उत्तर आणि दक्षिण ध्रुवांमधून जाणाऱ्या व विषुववृत्ताला काटकोनात छेदणाऱ्या काल्पनिक वर्तुळांना रेखावृत्ते म्हणतात. रेखावृत्तावरील प्रत्येक स्थानाचे रेखांश समान असतात. सर्व रेखावृत्ते एकमेकांना दोन व दोनच बिंदूंमध्ये छेदतात, हे बिंदू म्हणजे उत्तर व दक्षिण धृव होय. रेखावृत्तांपैकी एक रेखावृत्त ०० मानले जाते. ०० रेखावृत्ताला मूळ ‘रेखावृत्त’ म्हणतात. मूळ रेखावृत्तापासून इतर रेखावृत्तांची कोनीय अंतरे अंशामध्ये सांगितली जातात. त्यांना रेखांश असे म्हणतात. ०० रेखावृत्त आणि १८०० ही रेखावृत्ते पृथ्वीगोलावर एकमेकांसमोर येतात. त्यामुळे तयार होणारे वर्तुळ पृथ्वीची पूर्व गोलार्ध व पश्चिम गोलार्ध अशी विभागणी करते. अक्षवृत्ते जशी ध्रुवांकडे लहान लहान होत जातात, तशी रेखावृत्ते होत नाहीत. सर्व रेखावृत्ते आकाराने सारखीच असतात. रेखावृत्तांची मूल्ये सांगताना रेखावृत्ते पूर्व गोलार्धात आहेत की पश्चिम गोलार्धात आहेत हे सांगणे महत्त्वाचे आहे. जर रेखावृत्त पूर्वगोलार्धात असतील तर त्यांचा उल्लेख.१००पू, २५०पू. १३५०पू. असा करतात. जर रेखावृत्ते पश्चिम गोलार्धात असतील तर त्याचा उल्लेख १००प.,२५०प,१३५०प. असा करतात. पृथ्विगोल आणि कोनीय अंतर पृथ्वीगोल कोनीय अंतर विषुववृत्त पृथ्वीची कोनीय मापे रेखावृत्ते आकृतीच्या सहाय्याने पाहू वृत्तजाळी