परिमिती व क्षेत्रफळ

आयत व चौरस यांच्या परिमितींची सूत्रे

views

3:37
आयत व चौरस यांच्या परिमितींची सूत्रे : मुलांनो आयत व चौरस यांसारख्या आकृत्यांची परिमिती आपण सूत्रांचा वापर करूनसुद्धा काढू शकतो. तर मग आपण बघूया आयताची परिमिती काढण्याचे सूत्र. आयताची परिमिती = लांबी +रुंदी+ लांबी + रुंदी आयताच्या समोरासमोरील बाजू समान असतात (गुणधर्मा नुसार ). म्हणजेच लांबी 2 वेळा व रुंदी दोन वेळा असते. म्हणून आयताची परिमिती = २ × लांबी + 2 × रुंदी . या सूत्रावरून आपण काही उदाहरणे सोडवू. उदा – समजा एका आयताची लांबी 7 सेमी व रुंदी 3 सेमी आहे तर त्या आयताची परिमिती किती? शि: आता सूत्राचा वापर करून आपण काही उदाहरणे सोडवू. आयताची परिमिती = 2 × लांबी + 2 × रुंदी = 2 × 7 सेमी + 2 × 3 सेमी = 14 + 6 सेमी = 20 सेमी. म्हणून आयताची परिमिती = 20 सेमी आहे. यामध्ये आपण लांबी 7 सेमी. ची दुप्पट व रुंदी 3 सेमी ची दुप्पट केली. व दोन्ही दुपटींची बेरीज करून परिमिती काढली. चौरसाची परिमिती शि: मुलांनो, तुम्हाला हे माहीतच आहे की,चौरसाला चार बाजू असतात. आणि त्याच्या सर्व बाजूंची लांबी समान असते. म्हणून चौरसाची परिमिती = 4 x एका बाजूची लांबी असते. .