बेरीज व वजाबाकी

सरावासाठी उदाहरण 1

views

6:33
सरावासाठी उदाहरण 1 1234 + 67,532 + 3,34,321 याची बेरीज करूया. 1234 + 67,532 + 3,34,321 . शिक्षक : एकक स्थानावरील अंकाची बेरीज किती ? विद्यार्थी – 7 शिक्षक – बरोबर • आता दशक स्थानावरील अंकाची बेरीज किती सांगा बरं ? विद्यार्थी – आठ. • शतक स्थानाची बेरीज करून बघा बरं विद्यार्थी – बाई बेरीज 10 येते. शिक्षक – मग काय करणार तू सांग बर ! विद्यार्थी – बाई मी शतक स्थानी शून्य लिहणार व हातचा १ मनात धरणार शिक्षक – शाब्बास ! मग आता हजार स्थानाची बेरीज किती विद्यार्थी –बाई उत्तर १२ येते पण मनात धरलेला हातचा १ मिळवून उत्तर १३ झाले. शिक्षक –आता पुढे काय करणार ? विद्यार्थी – बाई पुन्हा हातचा 1 मनात धरून 3 हजार स्थानात लिहा आणि द.हजार स्थानकावरील अंकांची बेरीज करून त्यात मनात धरलेला हातचा मिळवला असता उत्तर 10 येते. पुन्हा तीच क्रिया करून द.हजार स्थानावर 0 लिहून लक्ष स्थानात हातचा मिळवला असता त्यांची बेरीज 4 येते. शिक्षक – अगदी बरोबर म्हणजे आपले उत्तर आले 4,03,087