मापनावरील उदाहरणे

प्रस्तावना

views

3:39
दैनंदिन जीवनात आपण वेगवेगळ्या वस्तूंचे मोजमाप करत असतो. मोजमाप करणाऱ्या साधनांचा वापर व मोजमापनांची साधने यांचा सविस्तर अभ्यास आपण पूर्वीच केला आहे. आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे त्यांची उत्तरे द्या पाहू! शिक्षक :- दूध, तेल यांसारखे द्रव पदार्थ आपण कोणत्या एककामध्ये मोजतो? विध्यार्थी:- लिटरमध्ये शि: बरोबर. समजा अजयला दुकानातून अडीच किलो साखर घ्यायची आहे तर दुकानदार कोणती वजने वापरेल? वि: 1किलो ची दोन वजने व 500 ग्रॅमचे एक वजन. किंवा दोन किलोचे एक वजन 500 ग्रॅमचे चे एक वजन शि: छान. कापड मोजण्यासाठी कोणत्या एककाचा वापर करतात? वि: कापड मोजण्यासाठी मीटर आणि सेंटीमीटर या एककाचा वापर केला जातो शि: अगदी बरोबर! आपण चौथीत असताना एककाचे परस्पर रूपांतर कसे करतात ते पाहिले. लांबी, वस्तुमान, धारकता मोजण्यासाठी अनुक्रमे मीटर, ग्रॅम ,लिटर ही एकके वापरतात. बाजारहाट करण्यासाठी रुपये, पैसे ही एकके वापरतात. कालावधी मोजण्यासाठी दिवस, तास, मिनिटे अशी एकके वापरतात. 1मीटर =100 सेमी, 1 किलो ग्रॅम = 1000 ग्रॅम,1 लिटर = 1000 मिली, 1 किमी =1000 मी, 1 रुपया = 100पैसे, 1 मिनिट = 60 सेकंद,1 तास = 60 मिनिटे. तर मग आज आपल्याला या सर्व एककांचा वापर करून बेरीज वजाबाकी, भागाकार, गुणाकार कसे करतात याचा अभ्यास करायचा आहे.