मापनावरील उदाहरणे Go Back वजाबाकीची उदाहरणे सोडवू views 3:35 आता काही वजाबाकीचीही उदाहरणे सोडवू. ज्या पद्धतीने आपण वजाबाकी क्रिया करून इतर उदाहरणे सोडवतो त्याच प्रकारे आपण मापनावरील वजाबाकीची उदाहरणे सोडवू शकतो. उदाहरण : 7 लिटर 150 मिलीलीटर – 2 लिटर 500 मिलीलीटर = ? हे गणित सोडवताना सुरुवात आपण मिलीलिटर पासून करू. पहा, 150 मधून 500 वजा होत नाही म्हणून आपल्याला लिटर या एककातून 1 हातचा मिलीलीटरमध्ये घ्यावा लागेल. 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलीटर. हा १ हातचा मिलीलीटर मध्ये घेतल्याने आता मिली या एककात 1150 मिलीलीटर झाले आहेत. या 1150 मधून 500 वजा केले तर 1150- 500 = 650 मिलीलीटर शिल्लक राहिले. आता लिटर या एककातून १ हातचा मिलीलिटर मध्ये दिला असल्याने तिथे राहिले 7-1 = 6 लिटर. या 6 लिटर मधून आपण 2 लिटर वजा करू. तर 6-2=4 लिटर शिल्लक राहिले. म्हणून 7 लिटर 150 मिली - 2 लिटर 500 मिलीलीटर = 4ली 650 मिलीलीटर होइल आणखी आणखी काही उदाहरणे सोडवू. उदाहरण 1): 25 रुपये 35 पैसे - 18 रूपये 75 पैसे =? पहा, 35 पैशामधून 75 पैसे वजा होत नाहीत. म्हणून आपल्याला रुपये या एककातून 1 रुपया पैशामध्ये रूपांतर करून घ्यावा लागेल. म्हणून 25 रुपयामधून 1 रुपया कमी केल्यावर राहिले 24 रुपये. आणि 1 रुपयाचे पैशात रूपांतर केल्यामुळे पैसे या एककत झाले 135 पैसे. आता आपल्याला 135 पैशातून ७५ पैसे सहज वजा करता येतील. ते वजा केले तर शिल्लक राहिले 60 पैसे. रुपये या एककातील 24 रुपयांमधून 18 रुपये वजा केले तर शिल्लक राहिले 6 रुपये. म्हणून 25 रुपये 35 पैसे - 18 रुपये 75 पैसे = 6 रुपये 60 पैसे शिल्लक राहिले.. प्रस्तावना बेरजेची उदाहरणे सोडवूया वजाबाकीची उदाहरणे सोडवू शाब्दिक उदाहरणे गुणाकाराची उदाहरणे सोडवू भागाकाराची उदाहरणे सोडवू