वर्तुळ

त्रिज्या व व्यास यांमधील संबंध

views

2:51
त्रिज्या व व्यास यांमधील संबंध : आपण पाहतो आहोत की या वर्तुळात OAOA व OBOB ह्या त्रिज्या आहेत. आणि ABAB हा व्यास OA व OB या दोन्ही त्रिज्यांपासून बनला आहे. वर्तुळातील या एका त्रिज्येची लांबी ३ सेमी आहे. आणि व्यास हा दोन त्रिज्यांचा मिळून बनला आहे. म्हणून व्यासाची लांबी = ३+३ =६ सेमी असेल. यावरून व्यासाची लांबी ही त्रिज्येच्या लांबीच्या दुप्पट असते. याचाच अर्थ असा की जर व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो तर त्रिज्या ही व्यासाच्या निम्मी असते. आपण काही उदाहरणे सोडवू: १) वर्तुळाची त्रिज्या जर ३ सेमी असेल तर व्यास किती असेल ? व्यास = त्रिज्या २ = ३ २ = ६ सेमी २) वर्तुळाचा व्यास जर ८ सेमी तर त्रिज्या ? त्रिज्या = व्यास / २ = ८/२ = ४ सेमी