आकृतीबंध

प्रस्तावना

views

3:26
आपण चौथीपासून आकृतिबंधांचा अभ्यास करत आलोय. विविध वस्तूंमधील आकृतिबंध, अंकांमधील आकृतिबंध आपण सहजपणे शोधू शकतो.आकृतिबंध पूर्ण करण्यासाठी अगोदर आपल्याला दिलेल्या चित्रामधील सहसंबंध शोधून काढावा लागेल. यामध्ये प्रथम 2 फुले आणि नंतर 1 पान असे दिले आहे. त्यामुळे अशाच प्रकारचा म्हणजे दोन फुले, एक पान असाच आकृतिबंध आपल्याला रिकाम्या जागेत काढून पूर्ण करावा लागेल. अतिशय सहज आणि सोपा वाटणारा हा आकृतिबंध आजपर्यंत आपण अभ्यासला आहे. या आकृतिबंधातील उपघटक म्हणजे चौरस संख्या आणि त्रिकोणी संख्यांचा अभ्यास आता आपल्याला करायचा आहे. सर्वप्रथम चौरस संख्या म्हणजे काय ते पाहू या. चौरस संख्या :मुलांनो दिवाळीत आपण सर्वजण घरासमोर ठिपक्यांची रांगोळी काढतो की नाही? तसे ठिपके इथे आहेत. या ठिपक्यांच्या मांडणीची रचना जर आपण पहिली तर ती चौरसाकार दिसते. चौरसाकार मांडणी होण्यासाठी प्रत्येक उभ्या आणि आडव्या ओळीत तेवढेच ठिपके असायला हवेत. म्हणजेच, चौरस संख्या तयार होण्यासाठी दिलेल्या संख्येला त्याच संख्येने गुणले असता त्यापासून चौरस संख्या मिळते.