त्रिमितीय आकार

शंकू

views

2:24
शंकू:- मुलांनो आपण शंकूच्या आकाराच्या काही गोष्टी आपल्या आजूबाजूला नेहमीच पाहत असतो घरातील झुंबर, ठोकळ्यांची खेळणी. अशाच आकाराच्या या दोन आकृत्या पहा. ( पान क्र. 96 पहा) एक आकृती आहे आईस्क्रीमच्या कोनाची आणि दुसरी आकृती आहे विदूषकाच्या टोपीची. या दोघांचा आकार हा सारखाच आहे. म्हणजे टोकाशी निमुळता होत गेलेला. पण यातील आईस्क्रीमचा पृष्ठभाग हा बंद केला आहे. तर टोपीचा पृष्ठभाग हा बंद केलेला नाही. सपाट चकतीने बंद केलेल्या शंकूला एक वक्रपृष्ठ असते. एक वर्तुळाकार सपाट पृष्ठ असते आणि एक वर्तुळाकार कड असते. तर बंद न केलेल्या शंकूला एक वक्रपृष्ठ आणि एक वक्र कड असते. परंतु सपाट पृष्ठ नसते. आता आपण या कागदाने शंकू तयार करू. यासाठी प्रथम C केंद्र असलेले एक वर्तुळ कंपासाच्या सहाय्याने कागदावर काढा. त्यानंतर वर्तुळाच्या C या केंद्रातून दोन त्रिज्या काढा. त्यांना अनुक्रमे CR आणि CS अशी नावे द्या. आता हे कागदावरील वर्तुळ कापून घ्या. दिलेल्या त्रिज्यांवर ते कापून घेऊन त्याचे दोन तुकडे करा. आता प्रत्येक तुकड्याच्या CR व CS या बाजू CRएकमेकींना जोडा. पहा दोन्ही तयार झालेले आकार हे शंकू सारखे दिसत आहेत. .