पूर्णांक संख्यांचा गुणाकार व भागाकार Go Back पूर्णांक संख्यांचा गुणाकार views 3:10 पूर्णांक संख्यांचा गुणाकार : तर आता आपण पूर्णांक संख्यांचा गुणाकार कसा करायचा ते पाहू. हे समजण्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण समजावून सांगते. तुम्ही नीट समजून घ्या. मयुरी शाळेतून घरी जात असताना तिची सायकल रस्त्यात पंक्चर झाली. त्यावेळी पंक्चर काढण्यासाठी तिच्याजवळ पुरेसे पैसे नव्हते. मग तिच्या मैत्रिणी स्नेहल, शीतल आणि कोमल या तिघींनी तिला प्रत्येकी 5 रु. उसने दिले. हे प्रत्येकी 5 रु. उसने मिळाल्याने मयुरीकडे एकूण 15 रु. उसने झाले. आणि त्यातून तिने सायकल दुरुस्त केली. मुलांनो आपण उसने घेतो, म्हणजे कर्ज घेतो. आणि हे कर्ज (-) ऋण या चिन्हाने दर्शवितात. म्हणजेच मयुरीकडे एकूण (-5) + (-5) + (-5) = -15 रु. जमा झाले. या ठिकाणी (-5) हे 3 वेळा घेतले आहेत. म्हणून (-5) × 3 = -15 झाले. किंवा तुम्ही 3 × (-5) घेतले तरीही ते (-15) च होतात. आता दुसऱ्या दिवशी मयुरीने तिच्या आईकडून 15 रुपये आणले आणि प्रत्येकीचे पैसे परत करून तिने तिचे कर्ज फेडले. मुलांनो, कर्ज काढून टाकणे म्हणजे पैसे मिळवणे म्हणजेच – (-15 ) = + 15 होतात हे लक्षात घ्या. प्रस्तावना पूर्णांक संख्यांचा गुणाकार ऋण संख्यांचा पाढा पूर्णाक संख्यांचा भागाकार धन पूर्णांकाला ऋण पूर्णांकाने भागणे ऋण पूर्णांकाला ऋण पूर्णांकाने भागणे