वितरणाचे नकाशे

भौगोलिक क्षेत्रभेट

views

2:59
क्षेत्रभेट ही भूगोलातील एक महत्त्वाची अभ्यास पद्धती आहे. यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण घेता येते. भौगोलिक किंवा नैसर्गिक संकल्पनाचा व घटकांचा प्रत्यक्ष अनुभव क्षेत्रभेटीने घेता येतो. मानव व पर्यावरण यांच्यातील सहसंबंध जाणून घेण्याच्या दृष्टीने भौगोलिक क्षेत्रभेटी अत्यंत उपयुक्त असतात. उदा :- आपण क्षेत्रभेटीसाठी जर ‘धरण’ हा घटक निवडला तर त्या धरणामधील जलसाठा कसा तयार होतो त्याठिकाणची भौगोलिक परिस्थिती, त्या धरणामुळे लोकांना झालेला फायदा, त्या धरणामधील पाण्यावर चालणारे विविध उद्योगधंदे - म्हणजे शेती, मासेमारी, वीजनिर्मिती, पर्यटन यांसारख्या गोष्टींचा अभ्यास करता येतो. क्षेत्रभेटीमुळे आपल्याला या सर्व गोष्टी प्रत्यक्ष पाहता येतात. व त्या आपल्याला पटकन समजतात आणि दीर्घकाळ लक्षात राहतात. त्यामुळे भूगोलाचा अभ्यास करणे सोपे होते.