बाह्यप्रक्रिया भाग २ Go Back नदीचे खनन कार्य views 2:15 नदीचे खनन कार्य म्हणजे नदी वाहत असताना तिच्यामुळे होणारी भूपृष्ठाची झीज होय. नदीचा उगम समुद्रसपाटीपासून खूप उंचावर होतो. नदी उगम पावते त्या प्रदेशात ती खूप वेगाने वाहते. त्यामुळे तिची झीज करण्याची शक्ती जास्त असते. नदीच्या वेगवान प्रवाहामुळे व तिच्यातील रेती दगडगोटे यांमुळे तसेच तिला येऊन मिळणाऱ्या अनेक उपप्रवाहांमुळे नदीच्या तळाचे व काठांचे खनन होते, म्हणजे ते खणले, खोदले जातात.यांमुळे घळई, व्ही(v) आकाराची दरी आणि धबधबा इत्यादी भूरूपे तयार होतात. घळई म्हणजे खोल व अरुंद दरी होय. घळईचे उतार अत्यंत तीव्र व जवळ जवळ उभे असतात. नदीच्या खननकार्यामुळे तयार होणारे हे एक भूरूप आहे. ‘V’ आकाराची दरी नदीच्या उगमाकडील भागात तयार होते. नदीप्रवाहाच्या पृष्ठा लगत उभे खनन वेगाने होते. त्यामानाने दरीच्या उताराच्या भागात खनन कमी होते. त्यामुळे त्यांची उंची जास्त राहते. परंतु, काठांचे खनन होत गेल्याने नदीचे पात्र पृष्ठभागालगत रुंद होत जाते. त्यामुळे दरीस v या इंग्रजी अक्षरासारखा आकार प्राप्त होतो. धबधबा म्हणजे बऱ्याच उंचावरून थेट खाली पडणारा पाण्याचा नैसर्गिक प्रवाह होय. हा प्रवाह प्रामुख्याने नदीचा असतो. वरील तीन भूरूपे ही नदीच्या खनन कार्यामुळे तयार होतात. प्रस्तावना नदीचे खनन कार्य नदीचे वहन व संचयनकार्य मुलांनो ही चित्रे पहा यातील हिमनदीचे खनन कार्य हिमनदीचे वहन व संचयन कार्य वाऱ्याचे कार्य व भूरूपे वाऱ्याचे संचयनकार्य सागरी लाटांचे कार्य व भूरूपे सागरी लाटांचे संचयन कार्य भूजलाचे कार्य व भूरूपे