बाह्यप्रक्रिया भाग २

भूजलाचे कार्य व भूरूपे

views

5:28
जमिनीत मुरलेले पावसाचे पाणी सच्छिद्र खडकातून अथवा खडकातील भेगांमधून खाली जाते. हे पाणी अच्छिद्र खडकाच्या थरांपर्यंत जाऊन तेथे साठते. असे साठलेले पाणी म्हणजे भूजल होय. खडकातील विद्राव्य खनिजे पाण्यात विरघळतात व ती खनिजे भूजलाबरोबर वाहत जातात. हे भूजलाचे खननकार्य होय. भूजलाचे बाष्पीभवन झाल्यास म्हणजे पाणी निघून गेल्यास किंवा भूजलाच्या द्रावणक्षमतेपेक्षा म्हणजेच पाण्याची इतर पदार्थ विरघळवून घेण्याच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात विद्राव्य खनिजांचा पुरवठा झाल्यास त्यातील विरघळलेल्या स्थितीतील खनिजांचे संचयन होते. म्हणजेच भूजलाचे बाष्पीभवन होऊन वाहून आणलेली खडकातील खनिजे शिल्लक राहतात त्यांचे संचयन होते. अशा प्रकारे भूजलाचे खनन, वहन व संचयन कार्य होत असते. भूजलाच्या या कार्यामुळे विलयविवर, चुनखडीच्या प्रदेशातील गुहा, अधोमुखी लवणस्तंभ इ. भूरूपे तयार होतात.