सागरजलाचे गुणधर्म

प्रयोग

views

5:39
प्रयोगच्या आधारे आपण समजून घेणार आहोत की, समुद्रातील क्षारांचे प्रमाण कमी- जास्त का असते? तसेच, क्षारतेवर कोणकोणते घटक परिणाम करतात? प्रयोग:- प्रथम एका मोठ्या उभट भांड्यात दीड लीटर पाणी घ्या. नंतर या पाण्यात १०० ग्रॅम बारीक मीठ टाका. नंतर ते ढवळा म्हणजे मीठ त्या पाण्यात पूर्णपणे विरघळेल. आता समान आकाराची तीन भांडी घ्या. ती भांडी ओळखण्यासाठी तिन्ही भांड्यांवर वेगवेगळ्या रंगांचे ठिपके द्या. म्हणजे आपल्याला प्रयोग करताना भांडी व त्यातील पाणी ओळखणे सोपे जाईल. आता ह्या तिन्ही भांड्यांमध्ये पूर्वी मीठ मिश्रित केलेले पाणी समान प्रमाणात ओता. हे पाणी ओतल्यानंतर ती तिन्ही भांडी निम्मी रिकामी राहिली पाहिजेत. म्हणजे भांडी पाण्याने अर्धीच भरावयाची आहेत. आता सर्व जणांनी या पाण्याची चव घ्या. लक्षात ठेवा, तिन्ही भांड्यातील पाण्याची फक्त चव घ्यायची आहे. पाणी प्यायचे नाही. आता या तीन भांड्यांपैकी एक भांडे उचलून सूर्यप्रकाशात ठेवा. त्यावर जाळीचे झाकण ठेवा, आणि भांड्यावर निळ्या रंगांचे ठिपके द्या. मुलांनो, लक्षात ठेवा हे झाकण जाळीचेच हवे आहे. त्यानंतर उरलेली ही दोन्ही भांडी आपल्या या वर्गखोलीतच ठेवून द्या. त्यावरही जाळीचे झाकण ठेवा. वर्गातील एका भांड्यांत दररोज अर्धा ग्लास पाणी मिसळा. आणि या भांड्याला पिवळ्या रंगाचे ठिपके द्या. तिसऱ्या भांड्याला लाल रंगाचे ठिपके द्या. त्यात काहीही मिसळायचे नाही. ते भांडे तसेच ठेवा.