सागरजलाचे गुणधर्म

जरा विचार करा

views

2:17
पृथ्वीवरील सागरांतील सर्व क्षार एकत्र केल्यास त्याचे वजन सुमारे १२० दशलक्ष टन इतके होईल. ते पृथ्वीवर पसरल्यास त्याचा सुमारे १५० मीटर जाडीचा थर निर्माण होईल. म्हणजेच साधारणत: ४० मजली उंच इमारती एवढा होईल. समुद्रात एवढे क्षार/मीठ कोठून आले असेल बरं? भूपृष्ठावरील खडक आणि मृदा यांत विविध क्षार आणि खनिजे असतात. हे क्षार व खनिजे भूपृष्ठावरून वाहणाऱ्या नद्यांमधील पाण्यात विरघळतात. या नद्या सागराला मिळतात आणि पर्यायाने या विरघळलेल्या क्षारांचे संचयन सागरात होते. लाखो वर्षे ही क्रिया सतत चालूच असते. बाष्पीभवनामुळे सागरातील फक्त पाण्याची वाफ होते आणि क्षार पाण्यातच राहतात. त्यामुळे हळूहळू पाण्यातील क्षारांचे प्रमाण वाढत जाते. त्यामुळे समुद्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात क्षार असतात. आपण पाण्याचे तापमान मोजतो, पावसाचे प्रमाण मोजतो, तशीच सागराची क्षारताही मोजली जाते. त्यावरून समजते की कोणत्या समुद्रात जास्त क्षारता आहे. आणि कोणत्या समुद्रात कमी. सागराची क्षारता पुढीलप्रमाणे मोजली जाते: सागराचा १००० वजनी भाग पाण्यात एकंदर सर्व क्षारांचे मिळून जितके वजनी भाग प्रमाण असते, त्याला सागरजलाची क्षारता म्हंटले जाते. उदा.१००० ग्रॅम म्हणजेच १ किलोग्रॅम पाण्यात विरघळलेल्या क्षारांचे प्रमाण ४० ग्रॅम असेल, तर त्या पाण्याची क्षारता दर हजारी ४० म्हणजेच ४०%० (४० दर हजारी) अशी सांगितली जाते. सागरजलाची क्षारता मोजण्यासाठी हायड्रोमीटर, रीफ्रॅक्टोमीटर आणि सॅलिनोमीटर इत्यादी उपकरणांचा वापर केला जातो.