सागरजलाचे गुणधर्म Go Back घनता views 5:09 भौतिकशास्त्रामध्ये पदार्थाची घनता म्हणजे त्या पदार्थाचे वस्तुमान व आकारमान यांचे गुणोत्तर होय. सागरी जलाचे तापमान आणि क्षारता हे दोन गुणधर्म सागरी जलाची घनता नियंत्रित करतात, म्हणजेच तापमान कमी झाले की पाण्याची घनता वाढते. थंड पाण्याची घनता जास्त असते. तसेच अधिक क्षार ज्या पाण्यात असतात त्या पाण्याची घनता जास्त असते. परंतु, क्षारतेपेक्षा तापमान हा गुणधर्म घनतेवर अधिक परिणाम करतो. त्यामुळे काही वेळा जास्त क्षारता असलेल्या पाण्याच्या थराचे तापमान कमी असले, तरीही त्या जलाची घनता इतर जलाच्या घनतेपेक्षा जास्त असते. याउलट जास्त तापमान व कमी क्षारता असलेल्या सागरी जलाची घनता कमी असू शकते. म्हणजेच पाण्याच्या घनतेवर तापमानाचा जास्त परिणाम होत असतो. वाढत्या खोलीबरोबर सागरजलाचे तापमान आणि क्षारता कमी होते. मात्र घनता वाढते. कारण खोलीनुसार तापमान कमी-कमी होत जाते. तापमान कमी असते, तेव्हा घनता जास्त असते. पृष्ठभागापासून १००० मीटर नंतर सागरजलाच्या तापमान, क्षारता, घनतेतील बदलाचे प्रमाण शून्यवत असते. म्हणजे तिथून खाली यांच्यात काहीच बदल होत नाही. जो बदल आहे तो स्थिर राहतो. पृष्ठभागापासून ५०० मीटर खोलीपर्यंत सागरजलाच्या तापमान क्षारता, घनतेतील बदलाचे प्रमाण जास्त आहे. म्हणजेच पृष्ठभागाजवळ यांच्यात जास्त बदल होतात. १) तापमान कमी असेल, तर घनता वाढते. २) क्षारता कमी असेल, तर घनताही कमी होते. ३) मात्र क्षारता कमी असूनही तापमान कमी असल्यास घनता वाढते. प्रस्तावना सागरी प्रवाहाचे तापमान क्षारता प्रयोग जरा विचार करा नकाशाशी मैत्री जरा विचार करा. (अधिक माहिती) घनता