सजीवांचे परस्परांशी नाते

प्रस्तावना नागवेल,पळस,मेथी, अडुळसा,कढीलिंब

views

03:48
आपल्या आसपासच्या परिसरात अनेक प्रकारचे लहान मोठे सजीव आढळतात. हे सर्व सजीव आपल्या गरजा इतर सजीवांच्या मदतीनेच पूर्ण करीत असतात. त्या गरजा कशा पूर्ण केल्या जातात याची माहिती आज आपण या पाठातून घेणार आहोत. या वनस्पतीचे नाव नागवेल आहे. तिला पानवेल, विड्याची पाने किंवा खाऊची पाने असेही म्हणतात. ही पाने सुगंधी, तिखट, तुरट असतात. ती वात, कफ आणि मुखशुद्धीसाठी खाल्ली जातात. अशा प्रकारे विविध कारणांसाठी नागवेलीची पाने आपल्याला उपयोगी पडतात. पळस. ही एक औषधी वनस्पती आहे. आज आपण थर्मोकोलच्या किंवा प्लास्टिकच्या किंवा कागदी पत्रावळी वापरतो. पण पूर्वी या पळसाच्या पानांचा उपयोग पत्रावळी बनविण्यासाठी केला जात होता. याची पाने आपल्या तळहाताएवढी रूंद व जाड असतात. या झाडाला येणाऱ्या फुलांचा वापर पूर्वी रंग बनविण्यासाठी केला जात असे. फुलांच्या पुड्या बांधण्यासाठीही याची पाने वापरतात मेथी ही अत्यंत गुणकारी भाजी मानली जाते. मेथीचे बीसुद्धा खूप उपयोगी असते. मेथी पाचक असल्याने अपचनाची समस्या दूर होते. मेथीच्याभाजीत खनिजे व चोथा असतो. अशा प्रकारे मेथी वनस्पती उपयोगी पडते.अडुळसा या वनस्पतीची मुळे, पाने, फुले, औषधासाठी वापरतात. सर्दी, खोकला, दमा, इ.वर अडुळसा खूप गुणकारी आहे. कढीलिंब यांची पाने रोज स्वयंपाकात फोडणी घालते वेळी वापरली जातात. कढीलिंबाच्या पानांनी जेवणात स्वाद येतो. ही झाली उपयोगी वनस्पतींची काही उदाहरणे, पण जरा विचार कराल, तर तुमच्या लक्षात येईल की आपल्या अन्नातील सर्व प्रकारच्या फळभाज्या, पालेभाज्या, धान्ये, डाळी, मसाल्याचे पदार्थ, फळे ही आपल्याला वनस्पतींपासून मिळतात.